लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात

लग्नासाठी जोडीदार पाहताना आपण बऱ्याच निकषांचा वापर करतो. वेगवेगळ्या अटी तटी लक्षात घेतल्या जातात. तसेच जोडीदार अमुकच हवा. जोडीदारा मध्ये हेच गुण हवे. सतत त्या अपेक्षांची भूनभून डोक्यात चालतच असते.

मुलांना मुलींमध्ये बऱ्याच गोष्टी हव्या हव्या अशा वाटतात. आपली होणारी बायको आपल्या आईप्रमाणे कुशल सुद्धा हवी आणि आपली प्रेयसी पण तिने बनावे असे देखील विचार मुलांचे असतात. म्हणूनच लग्नासाठी मुलीमध्ये कोण कोणते गुण असायला हवे ते आपण या लेखामध्ये पाहूया.

लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात

तर या आणि अशा बऱ्याच गुणांचा खजिना मुलींमध्ये असला पाहिजे

मुलगी पाहण्याची पूर्वीची पद्धत

तुम्ही ऐकून असाल कि आधी मुलीला चालून दाखवायला सांगायचे किंवा गायला सांगायचे या गोष्टीचा खरा अर्थ म्हणजे तिला चालते येते का हे तपासायचे होते आणि गाणे गाऊन दाखवायला यासाठी सांगायचे ते म्हणजे तिला बोलता येते कि नाही हे तपासायचे असते.

तर काही वर्षांपूर्वी हि अशा प्रकारची परीक्षा मुलींची घेतली जायची एवढेच नव्हे तर काही वेगळेच प्रश्न देखील विचारले जायचे जसे कि विहिरीला पायऱ्या किती आहेत? चुलीत लाकडे किती आहेत ? वगैरे वगैरे मग मुलींनी पटकन उत्तर दिले कि तिचा हजरजबाबाबीपणा दिसून येतो.

मला आठवते माझ्या सासूबाईंनी पण एक प्रश्न मला सांगितलेले गावात बऱ्याच ठिकाणी मुलीला भाकरी किंवा पापड भाजून दाखवायला लागायचा. यावरून लक्षात यायचे कि मुलगी स्वयंपाकात किती हुशार आहे? 

सत्य  परिस्थिती:

तसे पाहता हल्लीच्या मुली गुणसंपन्न आहेत यात वादच नाही आणि आजकाल मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि ते चुकीचे नाही आहे.

कारण आज काळ मुली सुद्धा मुलांच्या तोडीस तोड आहेत हे काही वेगळे सांगायला नको. वरील गुंणांपैकी सगळेच गुण असतील असे नाही. काही कमी जास्त होऊ शकते आणि एवढेच नव्हे तर लग्नानंतर बऱ्याच नवीन गुणांमध्ये भर पडते असा माझा अनुभव आहे.

लग्नासाठी मुलीमध्ये इतके गन पाहण्याची खरंच गरज आहे का

गुण किती आहेत,नाहीत. यापेक्षा त्या व्यक्तीला महत्व दिले तर फार चांगले होईल. कारण कोणी हि परफेक्ट नसते. थोडा फार अड्जस्ट केलेच पाहिजे कि आणि हो ज्यांना अगदी व्यवस्थित आणि सर्व गुणसंपन्न जोडीदार हवा असेल. तर, आधी ते स्वतः सर्व गुण संपन्न आहेत का? हे आधी तपासून पाहावे.

त्यात तिच्या पत्रिकेचे गुण मिलन हि केले जाते. हे देखील तिची परीक्षा घेणेच झाले आणि बाकी देखील मुलीने एक्दम व्यवस्थित,नीट नेटके असावे, तिला कितीही त्रास होवो. चेहऱ्यावर कायम हसू असावे आणि इतर बऱ्याच गोष्टी मुलांना वाटत त्यांच्या होणाऱ्या जोडीदारात हव्यात. जे काही असेल ते जास्त पण अडून राहू नये.   

Exit mobile version