गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. प्रत्येकाला लग्न करायचे असते. मग तो कोणीही असो. या लग्नामुळेच दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसे, वेगवेगळे कुटुंबे एकत्र येतात असे म्हटले तरी चालेल.  इथे आपण पाहणार आहोत की एका गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

 प्रत्येकाला वाटते की आपले देखील लग्न व्हावे. योग्य तो जोडीदार मिळावा, संसार करावा वगैरे. वरील प्रश्नाचे उत्तर देण्याआधी अनाथ मुलीशी लग्न करण्यासाठीची प्रक्रिया पाहूया. 

अनाथ मुलीशी लग्न करण्यासाठीची प्रक्रिया:

जर मुलगी अनाथ आश्रमातील असेल. तर या मुलाला रीतसर अर्ज करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्याच्या दिलेल्या माहितीची पडताळणी किंवा चौकशी होईल आणि मग तिथून ते अर्ज डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांच्याकडे पाठवले जातात आणि जर सगळं काही व्यवस्थित असेल. तर तो अर्ज पुन्हा अनाथाश्रमामध्ये येतो आणि मग मुलास त्याची निवड झाली आहे हे कळवले जाते. मग या मुलीचं कोर्टाच्या द्वारे हस्तांतरण केलं जातं.

तर ही होती प्रक्रिया थोडक्यात.  आता पाहू वरील प्रश्नाचे उत्तर.

मुख्य म्हणजे मुलगा गरीब आहे. आता गरीब कोणत्या दृष्टीने म्हणायचा? त्याच्याकडे कमी पगाराची नोकरी आहे? की राहायला घरच नाही? 

आपण यामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीतून पाहूया: 

परिस्थिती क्रमांक १:

मुलगा अगदीच गरीब आहे. त्याला नोकरी नाही आणि स्वतःचे घरही नाही. अशामध्ये एका अनाथ मुलीशी जर त्याने लग्न करावे का? आता इथे अनाथ मुलगी ही त्याच्या ओळखीचेच असेल. तर वेगळी गोष्ट. त्यात पण मुलाचे घर किंवा नोकरी यातील काहीच नाही. तर कोणतीच मुलगी लग्न करण्यास तयार होणार नाही. हा आता काही अपवाद असतील.

मुलगी अनाथ आहे. जर ती अनाथ मुलगी अनाथ आश्रमामध्ये राहत असेल आणि त्या मुलीशी जर त्याला लग्न करायचे असेल. तर त्या मुलाला वरील प्रक्रियेतून जावे लागेल आणि ह्या प्रक्रियेमध्ये तो मुलगा नक्कीच बाद होईल. कारण स्वतःचे घर तर नाहीच आहे. पण नोकरी देखील नाही.

परिस्थिती क्रमांक २:

मुलगा गरीब आहे. म्हणजेच नोकरी कमी पगाराची आहे आणि घर देखील भाड्याने आहे. जसे मी म्हटले जर मुलगी स्वतःहून त्या मुलाला ओळखत असेल आणि त्या दोघांचा तो सर्वस्वी निर्णय असेल. तर मग मुलाची आई वडील यांच्या निर्णयावर ती सर्व काही अवलंबून आहे. कारण शेवटी संसार या दोघांना करायचा आहे.

  तसेच जर ती मुलगी अनाथ आश्रमातील असेल. तर वरील प्रक्रिया पूर्ण होऊन जर अनाथाश्रमातील लोकांना वाटले की हा मुलगा त्या मुलीला सुखी ठेवू शकतो. बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. तर मग कदाचित या दोघांचे लग्न होऊ शकते.

तात्पर्य:

  खरे पाहता अशी कुठची परिस्थिती उध्दभवणे फारच कठीण आहे. कारण अनाथ मुलीशी लग्न करण्याचा निर्णय फार कमी लोक घेतात. त्यात प्रत्येक मुलाला याची जाण असते की जर आपल्याला लग्न करायचे आहे. तर आपण स्वतःच्या पायावरती उभे राहणे गरजेचे आहे. आपली नोकरी व्यवस्थित असली पाहिजे. राहतं घर देखील स्वतःच्या मालकीचे असलं पाहिजे. या सर्व गोष्टींची जाणीव प्रत्येक मुलांमध्ये असते.

पण तरीदेखील काही असे असतील की ज्यांना खरंच अनाथ मुलीशी लग्न करायचे आहे. तर अगदी तुमचं कौतुकच होईल. एक आदर्श तुम्ही समाजासमोर ठेवू शकाल. पण याचे भान असू द्या की आपण एक जबाबदारी आपल्यावरती घेत आहोत. एक माणूस आपल्या सोबत जोडले जाणार आहे आणि जिची सर्व काळजी ही तुम्हालाच घ्यायची आहे. कारण एक तर ती अनाथ आहे. तिचं पुढे मागे कोणी नाही. ती पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून असेल. दोघांनी मिळून जरी स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्याचा ठरवला आणि दोघांनी एकमेकांना पुरेशी साथ दिली.तडजोड, सहनशीलता, काळजी, प्रेम या वेगवेगळ्या गोष्टीतूनच संसार बहरत जातो,फुलत जातो. 

त्यामुळे एक चांगला माणूस म्हणून जर त्या अनाथ मुलीच्या आयुष्याला बदलण्याचे काम तुम्ही करत असाल. तर ते नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे गरीब असो वा श्रीमंत असो तुम्हाला अनाथ मुलीशी लग्न करायचे असेल तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. 

पण तरीही आपण स्वतःला नीट ओळखावे. आपण खरंच अजून दोन व्यक्तींचा भार घेण्यास सक्षम आहोत की नाही? हे आधी पहावे. त्यांना दोन वेळचे जेवण देऊ की नाही? एकंदरीत पाहता तिला सुखी ठेवू की नाही? याचा देखील आधी आपण विचार करावा आणि मगच पुढाकार घ्यावा.

Exit mobile version