मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?

मंगळ असलेल्या मुलींशी लग्न

आपल्याकडे लग्न करण्याआधी किंवा लग्न ठरवताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात. जसे कि मुलाची आणि मुलीची पत्रिका, उंची ,नोकरी वगैरे. त्यात पत्रिका जुळण्याला अधिक महत्व आहे. कारण त्यात मंगळ दोष आहे किंवा नाही हे देखील पहिले जाते.

तसे असल्यास लग्न न करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच असे हि म्हणतात कि मंगळ दोष असणाऱ्यांचे लग्न मंगळ दोष असणाऱ्यां सोबतच केले जाते. mangal asalelya mulishi lagn ka karat nahit?

मंगळ दोष म्हणजे काय? 

मंगळ दोष म्हणजे जर मंगळ ग्रहाच्या चढत्या घरात ४ थे घर, ७ वे घर, ८ वे घर, १२ वे घर यामध्ये असेल तर त्या जन्म पत्रिकेमध्ये मंगळ दोष असतो असे ज्योतिष शास्त्रात म्हणतात.

सूर्यमालिकेतील एक ग्रह, मंगळ, ज्याचा रंग लाल असतो. मंगळाला ज्योतिष शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. मंगळ हा साहस आणि ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. मेष आणि वृश्चिक या राशींचा स्वामी मंगळ असून अग्नी हे तत्व मंगळ ग्रहाचे आहे. मंगळ दोष ज्याला कि आपण मांगलिक देखील म्हणतो.

वैवाहिक जीवनावर होणारे परिणाम

मंगळ दोष असलेल्यांच्या वैवाहिक जीवनात काय परिणाम होतात ते पाहू

मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते या प्रश्नाचे उत्तर:

पत्रिकेत जर मंगळ दोष आढळला तर वर सांगितल्याप्रमाणे अनेक दुष्परिणाम वैवाहिक जीवनावर होतात. त्यामुळे मंगळ असलेल्या मुलाशी अथवा मुलीशी विवाह टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण विषाची परीक्षा कोण घेणार? सर्व काही माहित असूनही स्वतः च्या पायावर दगड मारून घेतल्या सारखे होते.

पण काही प्रेमविवाहा मध्ये असलेली जोडपी अशा दोषांना गृहीतच धरत नाहीत आणि लग्न करतात. त्यात काही यशस्वी होतात. तर काही नाही. मग स्वतः च्या चुकांना विचारात न घेता खापर मंगळ वर फोडतात.

पण मंगळ असलेल्या मुलींशीच नव्हे तर मंगळ असलेल्या मुलाशी देखील लग्न टाळले जाते. कारण तुम्हाला आता कळलेच असेल.

अशी समजूत आहे कि मंगळ असलेल्यांची लग्ने टिकत नाहीत. त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात. पण माझ्या मते लग्न टिकणे अथवा न टिकणे हे सर्वस्वी त्या जोडप्यावर अवलंबून आहे. कारण अशी अनेक अपवादात्मक जोडपी आहेत.

जे मांगलिक आहेत. पण त्यांचा संसार सुखाचा चालू आहे. शेवटी संसार म्हटला कि चढ उतार हे आलेच. या अडचणींच्या काट्यातून मार्ग काढत आपला प्रवास करायचा आहे. हे संसार चक्र चालवायचे आहे. तसेच अडचणी या फक्त लग्न झालेल्यानाच नाही तर सगळ्यांना असतात. जीवनाचा तो नियम आहे. सतत चांगला मार्ग, सरळ वाट कशी असेल? थोडे फार त्रास हे काढायचेच असतात.

मंगळ दोषावर काही उपाय: ज्योतिषशास्त्र काय सांगते

ज्योतिष शास्त्रात काही उपासना किंवा काही उपाय आहेत. त्यामुळे यामध्ये बदल होऊ शकतो. पण हा दोष पूर्णपणे दूर केला जाऊ शकत नाही.

S.Noमंगळ दोषावर उपाय
1काही वेळा कुंभ लग्न केले जाते आणि मग त्या व्यक्तीचे दुसरे लग्न लावून दिले जाते.
2मंगळवारी लाल मसूर दान करा. त्यामुळे थोडाफार प्रभाव कमी होऊ शकतो.
3हनुमान चालीसाचे पठण करावे.
4शिव आणि शक्तीची पूजा करणे.
5चांदीच्या वाटीमध्ये मध ठेवावा. स्वतः मध खाऊ नये.
6शंकराला लाल फुले अर्पण करावीत.
Exit mobile version