एकादशी: जाणून घ्या नेमका अर्थ, प्रमुख एकादशी, कथा, महत्व

एकादशी म्हणजेच अकरावा दिवस. शुक्लपक्षातील एका दिवशी व कृष्ण पक्षातील एका दिवशी एकादशी येते. म्हणजेच एका महिन्यात दोन एकादशी येतात. एकादशी ही भगवान श्री हरी विष्णूना खूप आवडते.

चला पाहू एकादशी विषयी माहिती

एकादशी म्हणजे नेमके काय?

एकादशीची कथा:

एकादशी ची एक कथा आहे. ज्याने आपल्या लक्षात येईल की एकादशी म्हणजे काय?

खूप वर्षांपूर्वी मूर नावाचा एक राक्षस होता. त्रिलोकावर अधिपत्य स्थापित केलेले. सर्व देवांवरती संकट आलेले. काही देव मृत्यू लोकात फिरत होते. शेवटी त्यांनी भगवान शंकराकडे मदत मागायचे ठरवले. भगवान शंकरांनी तुम्ही भगवान विष्णूंना मदतीसाठी हाक मारा असा सल्ला दिला आणि त्यानुसार सर्व देव क्षीरसागर मध्ये भगवान विष्णूची भेट घेण्यास निघाले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी भगवान विष्णूला साकडे घातले व खरी परिस्थिती सांगितली. 

त्यावर भगवान विष्णूंनी तो असुर कोण आहे? आणि त्याची अधिक माहिती सांगा असे ते म्हणतात. त्यावर इंद्र देव सांगतात की मूर असे त्या राक्षसाचे नाव असून, तो चंद्रा वती नावाच्या नगरी मध्ये राहतो. भगवान विष्णूंनी तिथे जायचे ठरवले. त्यांनी मूर राक्षसाला युद्धासाठी आवाहन केले. त्याने ते मान्य केले व युद्धाला सुरुवात केली. पण बरेच वर्ष होऊन देखील युद्धातून काहीच निष्पन्न होत नव्हते.

शेवटी भगवान विष्णू युद्धाचा शीण आल्याचे सांगून एका गुहेमध्ये जातात. त्यामागून मूर राक्षस देखील तिथे येतो. भगवान विष्णू त्या गुहेमध्ये योगनिद्रेत असतात आणि हीच संधी साधून मूर राक्षस त्यांच्यावरती हल्ला करतो.

तेवढ्यात भगवान विष्णूच्या शरीरातून एक ऊर्जा उत्पन्न होते आणि त्यातून देवी प्रकट होते व ती देवी त्या राक्षसाचा वध करते. त्यामुळे भगवान विष्णूंना मुरारी हे नाव देखील पडले व त्या देवीला एकादशी असे म्हणतात. म्हणजेच तिला उत्पन्न किंवा उत्पत्ती एकादशी देखील म्हटले जाते. कारण त्या दिवशी तिची उत्पत्ती झालेली, ती निर्माण झालेली, ती प्रकट झालेली यासाठी हे नाव दिले आहे.

तर अशा पद्धतीने एकादशी देवीची उत्पत्ती झाली किंवा निर्मिती झाली.

प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तरी येतातच. पहिल्या पंधरा वड्यात त्यातील कृष्ण पक्षांमध्ये एक एकादशी आणि पुढच्या पंधरा वड्यातील शुक्लपक्ष मध्ये दुसरी एकादशी.

आपल्याकडे एकादशीचे पालन करणारे बरेच आहेत. त्यात वारकरी, भागवत या धर्माचे लोक तर आवर्जून एकादशी पाळतातच. एकादशीचे उपवास करतातच. याच एकादशीच्या दिवसाला हरी दिनी असे देखील म्हणतात. म्हणूनच ही एकादशी विष्णूंना खूप प्रिय आहे असे म्हटले जाते.

प्रमुख एकादशी कोणत्या?

आपल्या सर्वांना हे माहीतच असेल की प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या एकादशी मानल्या जातात. त्यातील पहिली म्हणजे आषाढी एकादशी. ज्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्त भक्तगण आळंदीहून पंढरपुरात पायी जातात. हिला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. कारण या एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू हे निद्रेत जातात. म्हणजे झोपी जातात.

दुसरी एकादशी आहे ती म्हणजे कार्तिकी एकादशी. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू जागे होतात. या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास असे म्हणतात. चार महिने म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या दरम्यानचा जो काळ आहे त्याला चातुर्मास असे म्हटले जाते.

यामध्ये व्रतवैकल्य बरीच येतात. कार्तिकी एकादशी देखील आषाढी एकादशी सारखीच खूप महत्त्वाची मानली गेली आहे आणि ह्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू जागे होतात असा समज आहे. म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी देखील म्हटले जाते.

या दोन एकादशीचे व्रत तर वारकरीच काय इतर समाजात देखील ठेवले जाते. पण इतर एकादशी देखील आहेत. जशी की कमला एकादशी, भागवत एकादशी, निर्जला एकादशी, देवशयनी एकादशी वगैरे वगैरे. एकादशीचे व्रत करणारे त्या दिवशी उपवास ठेवतात तो व दुसऱ्या दिवशी सोडला जातो.

वार्षिक एकादशी कोणत्या व किती?

सर्वसाधारणपणे २४ एकादशी येतात. यातील निर्जला एकादशी सगळ्यात जास्त कठीण अशी एकादशी आहे. २४  ते २४ एकादशीचे जर आपण पालन केले तर आपल्याला मिळणारी पुण्य हे खूप जास्त फलदायी असते असे म्हणतात.

तसेच एकादशी कुठची असो ती शुभच मानली जाते आणि ही भगवान विष्णूंची प्रार्थना करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करण्यासाठी, या एकादशीचे व्रत केले जाते. त्यासाठी उपवास देखील केला जातो. एकादशीचे माहात्म्य म्हणून पुस्तक देखील आहे त्यात यावर अजून माहिती मिळेल

Exit mobile version