धुळवड धुलीवंदन रंगपंचमी: कारणे, प्रथा, इतिहास, काय काळजी घ्याल

फाल्गुन पौर्णिमेला होळी असे म्हणतात. होळीचा दुसरा दिवस म्हणजेच धुळवड किंवा धुलीवंदन किंवा रंगपंचमी. अनेक गावांमध्ये दोन दिवस, तीन दिवस, पाच दिवस, पंधरा दिवस होळी किंवा धुली वंदन साजरी करण्याची पद्धत आहे. चला पाहू धुलीवंदनाची माहिती.


खरे धुलीवंदन किंवा धुळवड म्हणजे होळी जाळून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी राख असते ती अंगाला लावणे आणि त्यानंतर स्नान करणे.

यात देखील तफावत आढळते. काही काही ठिकाणी चिखल फेकला जातो. धुळवळीची माती एकमेकांच्या अंगावर टाकली जाते. पण बऱ्याच प्रमाणात होळीची राख ही एकमेकांना लावली जाते आणि त्यानंतर स्नान केले जाते. म्हणजेच आपण धुली म्हणजेच धूळ आणि वंदन म्हणजे ती वंदनीय पवित्र अशी राख.

तेव्हा आपण आपल्या अंगाला लावायचं आणि त्यानंतर आपण आंघोळ करायची. अशी त्यामागची भावना असते. कारण पृथ्वी म्हणजेच माती म्हणजेच ही राख किंवा धूळ. तिला पूजन करण्याचे, तिच्यापुढे नतमस्तक होण्याचा, हा एक मार्ग आहे असे म्हटले तरी चालेल.

धुलीवंदनाच्या दिवशी काय केले जाते

पुरातन काळी श्रीकृष्ण व राधा यांनी देखील होळी खेळल्याचे आपल्याला ऐकण्यात आले असेलच. त्यामध्ये त्यांनी फुलांचा, नैसर्गिक रंगांचा उपयोग केलेला. पण हल्ली त्याच्या उलट आपल्याला पाहायला मिळते.
परंतु हळूहळू ही परिस्थिती बदलत चालली आहे. लोक देखील सजग होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक रंग देखील हल्ली उपलब्ध आहेत. जर ते नसतील तर आपण आपले घरगुती काही उपाय आहेत. जसे की हळद आहे किंवा मुलतानी माती आहे. यांचा वापर करून देखील धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करू शकतो.

धुलीवंदन / रंगपंचमी साजरे करताना काय काळजी घ्यावी

तसे हे रंगांची उधळण करणारे धुलीवंदन जर आपण सजगरित्या व सावधतेने साजरे केले तर नक्कीच त्याचा आपण पुरेपूर आनंद लुटू शकतो. यामध्ये कोणालाही इजा होणार नाही याची देखील खात्री बाळगली पाहिजे. त्यात कोणावरती जबरदस्ती करू नये. कोणाच्या मनाविरुद्ध रंग लावू नये. याचे देखील भान ठेवणे आवश्यक आहे. इतरांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा देखील आपण विचार करावा. कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही. याकडे देखील आपले लक्ष असले पाहिजे. तरच हा सण कुठच्याही संकटाशिवाय निर्विघ्नपणे पार पडू शकतो.

Exit mobile version