रथसप्तमी: कथा, पूजाविधी, महत्व, उपाय

रथसप्तमीला आरोग्य सप्तमी, पुत्र सप्तमी किंवा सूर्य जयंती असं देखील म्हटलं जातं. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते.

बिहार, ओडिशा,झारखंड इत्यादींमध्ये या सणाचे एक वेगळे महत्त्व आहे. दक्षिण भारतात देखील रथसप्तमी मोठ्या प्रमाणात साजरी करतात आणि तेथे याला ब्रह्मोत्सव असे म्हणतात. काही ठिकाणी सूर्यदेवाची रथयात्रा देखील काढली जाते.

रथसप्तमीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यानंतर उत्तरायणाला सुरुवात होते हे आपणा सर्वांना माहितच असेल. सूर्यदेवाची मनोभावे पूजा केली जाते.

रथसप्तमीची कथा

पूजा विधि

रथसप्तमी चे महत्व

पुराणात सांगितल्याप्रमाणे आदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्य. सप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि त्याच्या तेजाने सर्व ब्रह्मांड उजळून निघाले. सूर्य तेजस्वी, सामर्थ्यवान आणि बुद्धिमान आहेत. तसेच सूर्य सात घोडे असलेल्या रथातून प्रवास करतो आणि त्याचा हा उत्तरायनाचा प्रवास म्हणजेच रथसप्तमी असे म्हणतात.

मकर संक्रांति पासून सुरू झालेले हळदीकुंकू रथसप्तमीला समाप्त होते. या दिवशी पहाटे स्नान करून जर सुर्याची आराधना केली तर सर्व रोग आणि पापातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. तसेच पुत्रप्राप्तीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी संपत्तीसाठी, सौभाग्य मिळण्यासाठी सूर्य देवाची आराधना करतात.

रथसप्तमी: वैज्ञानिक महत्व

या उत्तरायण नंतर दिवस मोठे होतात आणि रात्री लहान होतात. तर ह्या सूर्याच्या तेजस्वितेमुळेच तर इतर ग्रहांना देखील प्रकाश मिळतो. अखंड ब्रह्माण्ड उजळून टाकण्याचे काम सूर्य करतो आणि त्याच्याच कृपेने आपल्याला देखील किंवा आपले जीवन देखील प्रकाशमय होते. 

आपली हिंदू संस्कृती आणि भारत देश कसा विविधतेने नटलेला आहे. वेगवेगळ्या प्रथा, व्रत, आणि बरंच काही. विविधतेत एकता म्हणतात ते हेच. एक गोष्ट जर आपण सर्वानी पहिली असेल तर लक्षात येईल कि पौराणिक कथांमध्ये थोड्या फार प्रमाणात आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन देखील पाहावयास मिळतो. जसे आता रथसप्तमी पासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते. याचा अभ्यास आपण सर्वानी केलाच होता कि, सूर्याचे उत्तरेकडे झुकणे म्हणजेच उत्तरायण होय आणि हि स्थिती २१ जून पर्यंत राहते.

 एक सूर्य जो त्याच्या प्रखरतेने तेजाने आपल्याला दिपवून टाकतो स्वतः मात्र तळपत असतो. त्याच्या मधून निघणाऱ्या प्रकाश किरणांनी संपूर्ण जग व्यापून टाकतो. अश्या त्या सूर्याला वंदन आणि हो हे एकाच दिवशी का करायचे? मला तर वाटते ते रोज सकाळी उठून सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य मंत्र म्हणणे तसेच सूर्यनमस्कार घालणे हे देखील जरी केले. तरी सूर्याचा आशीर्वाद मिळेल आणि आरोग्य उत्तम राहील. तरच आपण देखील सूर्यासारखे प्रखर प्रकाशमान आणि तेजस्वी बनू आणि असाध्य ते साध्य करू.

Exit mobile version