साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असावे?

साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असायला हवे ? लग्न जुळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. जर एखादे स्थळ जुळले आणि पुढची बोलणी होऊन साखरपुड्या पर्यंत गेले कि अर्धे टेन्शन संपते असे म्हणायला हरकत नाही. कारण साखरपुडा म्हणजेच एक निश्चिती असते कि आता हे लग्न होईल. पण काहीवेळा ते लग्नापर्यंत पोहचू शकत नाही. पण बऱ्याचदा लग्नापर्यंत गोष्ट पोहचतेच. आता विषय हा कि या साखरपुड्या पासून ते लग्नापर्यंत किती अवधी किंवा कालावधी असावा?

साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असावे?

साखरपुडा आणि लग्न यामधील अंतर जास्त नसावे कारण

साखरपुडा ते लग्न यामधील अंतर जास्त असल्यास

सत्य परिस्थती:

तसे पाहता आपल्याकडे याचा विचार बहुदा केला जात नाही कि साखरपुडा आणि लग्न यामध्ये नेमके किती अंतर असावे. कारण हा त्या कुटुंबाचा प्रश्न. कारण सगळं जुळून यावे लागते. एक तर लग्नाची तारीख सगळ्यांना सोयीची असायला हवी. त्यामुळे बऱ्याचदा साखरपुडा ते लग्न यात अंतर असते.

काहींना सगळं लवकर उरकायचे असते. म्हणून दोन्ही मध्ये जास्त अंतर नसते. तसेच सर्वांना सगळं काही सोयीचे आहे कि नाही हे देखील बघायचे असते. त्यानंतर मग लग्नाची किंवा साखरपुड्याची तारीख ठरवतात. तसे पाहता काही जणांचा साखरपुडा झाल्या झाल्या लग्न व्हायला हवे हाच अट्टाहास असतो काहींच्या बाबतीत मात्र हा अपवाद असतो.

तात्पर्य:

साखरपुडा आणि लग्न यामध्ये बराच वेळ बराच वेळ आणि मेहनत सुद्धा जाते. त्यामुळे दोन्ही एकाच वेळेला आटपलं तर आपलाच फायदा होणार आहे. नाहीतर साखरपुड्यासाठी वेगळी मेहनत आणि लग्नासाठी वेगळी मेहनत करावी लागेल. तसा हा निर्णय दोन्ही कुटुंबांचा असतो.

जो कि त्यांनी मिळून मिसळून घ्यायचा असतो. सगळ्या बाजू चाचपडून पाहायच्या असतात. सगळ्यांना जमेल का? तसेच विवाहाचे मुहूर्त आहेत का ते देखील बघायचे असते. तर या अशा वेगवेगळ्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. पण काही हि म्हणा,

मुलाला आणि  मुलीला त्यांच्या आयुष्यातले असे हे सोनेरी क्षण अनुभवायला मिळतात. हल्लीची मुले मुली सोशल मीडिया मुळे अजून जवळ येतात असे म्हणायला हरकत नाही. यात मुलाने आणि मुलीने थोड्या फ़ार प्रमाणात स्वतः वर अंकुश जरूर ठेवावा. आपल्या आई वडिलांना माना खाली घालाव्या लागतील असे काही वागू नका. त्यामुळे दोघांनीही थोडा संयम ठेवावा.साखरपुडा ते लग्न यामध्ये अंतर कितीही असूदेत. पण मनात अंतर येऊ देऊ नका.

Exit mobile version