होळी: महत्व, पौराणीक कथा, काय करावे काय नको

“होळी रे होळी, पुरणाची पोळी” हे वाक्य आपण सर्वांनी नक्की ऐकले असेल. होळीच्या दिवशी या वाक्याचा उपयोग नक्की केला जातो. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे होळी. तिला हुताशनी पौर्णिमा किंवा शिमगादेखील म्हणतात.

होळी सणाची माहिती

होळीची दंतकथा:

ही होळी साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे ती अशी की, हिरण्य कश्यप नावाचा राजा होता. तो फार अहंकारी आणि गर्विष्ठ होता. त्याचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा परम भक्त होता. तो सतत भगवान विष्णूचे नाव घेत राहायचा. याची चीड राजाला यायची. तो स्वतः लाच देव समजायचा आणि मुलाला देखील असेच सांगायचा. पण ते त्याला पटायचे नाही.

एके दिवशी राजा आपल्या बहिणीसोबत कट रचतो आणि स्वतः च्याच मुलाला मारायचे ठरवतो. राजाची बहीण होलिका तिला एक वरदान असते ते असे की तिला अग्नी जाळू शकत नाही. म्हणून ती प्रल्हादाला घेऊन बसते आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न करते. पण तीच त्यात जाळून खाक होते आणि प्रल्हाद काही जळत नाही कारण तो सतत भगवान विष्णूचा जप नामस्मरण करत असतो. तर अशा प्रकारे होलिका त्या अग्नित जाळून खाक होते.

भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे अग्नीपासून रक्षण केले म्हणून त्या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो. तसेच आपले दृष्ट विचार किंवा इतर वाईट गोष्टी त्या अग्नीत जाळून खाक होतात असे आपले मानणे आहे.

एकंदरीत पाहता होळीतील अग्नी वाईट वृत्ती जाळून टाकते. त्यामुळे होळी साजरी करतात आणि दुसऱ्या दिवशी वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणून रंगपंचमी साजरी करतात.

होळी शेतकऱ्यांसाठी महत्वाची

होळी कशी साजरी करतात?

Exit mobile version