मुलगा व मुलीचा रक्त गट एकच असेल तर काय होईल?

लग्ना करण्याआधी बऱ्याच गोष्टींची चौकशी केली जाते. सर्व बाजूनी सारासार विचार केला जातो. सर्व गोष्टींची कसून तपासणी केली जाते.

पत्रिका जुळतात कि नाही? गुणमिलन? घर दार, नोकरी वगैरे. एवढेच नव्हे तर हल्ली वैद्यकीय चाचण्या पण केल्या जातात.

त्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे वधू आणि वर यांचे रक्तगट (ब्लडग्रुप). असे म्हणतात की, लग्न होणाऱ्या मुलाचा व मुलीचा रक्तगट एकसारखे असू नये. जर असतील तर त्याचे दुष्परिणाम होतात.

लग्न करताना मुलगा आणि मुलीचा रक्त गट सारखाच असेल तर काही समस्या येऊ शकते का?

              खरे पाहता समान रक्तगट असलेल्या व्यक्तीची लग्न होऊ शकतात.  त्यांना लग्नानंतर कुठलाही  त्रास होत नाही. अशी अनेक जोडपी आहेत की, ज्यांचे रक्तगट एक असून देखील त्यांचे संसार व्यवस्थित चालले आहेत आणि त्यांच्या पासून  जन्मलेली अपत्ये  देखील सुद्रुढ आहेत, छान आहेत.  मग  असं का म्हटलं जातं की एकच रक्तगट असलेल्या व्यक्तींनी लग्न करु नये त्याचे वाईट परिणाम होतात? चला तर पाहूया.

ब्लड ग्रुप हे चार प्रकारचे असतात. जे की ए, बी, एबी, आणि ओ. तसेच ब्लड ग्रुप मध्ये “आर एच” (RH) फॅक्टर असतो.  तो म्हणजे आर एच पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह. म्हणजेच,

आता पाहू लग्नासाठी, मुलांचा कुठचाही ब्लड ग्रुप चालू शकतो. म्हणजेच वरील आठ पैकी कोणताही ब्लड ग्रुप मुलांचा चालतो आणि मुलींचा फक्त पॉझिटिव ब्लड ग्रुप चालतो.  म्हणजेच वरील पैकी जर मुलींचा पॉजिटिव ब्लड ग्रुप असेल आणि मुलांचा कुठचाही ब्लड ग्रुप असेल तरीदेखील लग्नानंतर काही समस्या उद्भवत नाहीत.

तसेच जर मुलीचा निगेटिव ब्लड ग्रुप असेल आणि मुलाचाही निगेटिव ब्लड ग्रुप असेल तरीही काहीही समस्या उद्भवत नाहीत. 

फक्त मुलीचा ब्लड ग्रुप जर निगेटिव्ह असेल आणि मुलाचा ब्लड ग्रुप जर पॉझिटिव्ह असेल.  तर मग त्यांच्यापासून होणाऱ्या दुसऱ्या अपत्यास त्रास होऊ शकतो. पहिल्या अपत्याच्या वेळी देखील त्रास होतो. पण त्यावेळी जर काळजी घेतली तर तो त्रास कमी होतो. म्हणजेच मुलाचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आणि मुलीचा ओ निगेटिव त्यामुळे त्यांच्या होणाऱ्या संततीला हीमोलायटिक रोग होऊ शकतो.

यामध्ये आईच्या या निगेटिव्ह ब्लडग्रुप मुळे त्या जन्म घेणाऱ्या मुलाला काही प्रमाणात त्रास होऊ शकतो. त्यात आईच्या रक्तातले अँटीबॉडीज लाल पेशींना मारून टाकतात. यावरती उपाय म्हणजे आईला पहिल्या गरोदरपणात सातव्या महिन्यात एक इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे यातला धोका कमी होतो.

सत्यपरिस्थिती:

सध्या वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झालेली आहे. त्यामुळे जर अशा काही समस्या उद्भवल्या तर त्यासाठी इलाज देखील आहेत. याच गोष्टीसाठी लग्न होण्याआधी जर मुलाने किंवा मुलीने वैद्यकीय तपासणी करून स्वतःचा रक्तगट खात्री करून घेतला.  तर काही समस्या उद्भवणार नाही. लग्न होण्याआधी नाही जमलं तर लग्न झाल्यानंतर तरी या तपासण्या नक्की करून घ्याव्यात किंवा अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याच्या वेळी तर या चाचण्या नक्की करून घ्याव्यात.  ज्यामुळे पुढील धोके हे टाळले जाऊ शकतात. डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे त्यावर ती योग्य ते उपचार केले जाऊ शकतात.

तात्पर्य:

म्हणूनच खरे पाहता रक्तगट जर एक सारखा असला तर काही समस्या येत नाहीत. पण जसे वर सांगितल्याप्रमाणे आर एच फॅक्टर हा या सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मुलीचे रक्तगट जर आर एच निगेटिव्ह आणि मुलाचे आर एच पॉझिटिव्ह असेल तर आणि तरच समस्या उदभवू शकते. अन्यथा नाही. त्यामुळे एकसारखे रक्तगट असलेल्या व्यक्ती नक्कीच लग्न करु शकतात. परंतु,वैद्यकीय चाचण्या करून जर तुम्ही लग्न करणार असाल तर ते अधिक फायदेशीर ठरेल. त्यामुळे कोणत्याच शंकेला वाव उरणार नाही. तसेच मनात असलेल्या सर्व प्रश्नांची योग्य ती उत्तरे आपल्याला या चाचण्यांमधून आणि डॉक्टरांकडून मिळतील.

Exit mobile version