सुखी संसाराची सूत्रे

माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. मला एक मुलगा आहे. बाळाचे संगोपन उत्तम करण्यासाठी मी नोकरी सोडून दिली.

पती कधी पैसे कमी पडू देत नाहीत. पण खूप अरसिक आहेत.

लग्न दोन जीवांचे नाते. विवाहा मुळे हे दोन जीव आयुष्यभर एकत्र बांधले जातात. प्रत्येक जोडप्याला तसेच त्यांच्या घरातल्यांना वाटत असते की आपल्या संसार हा सुखाचा व्हावा. पण कुठेतरी काहीतरी चुकत असते. दोघांपैकी एकाला काहीतरी कमी वाटत असते आणि मग अशा मध्ये घुसमट सुरू होते. एकांत वाढू लागतो आणि काही वेळेला चुकीची पावले देखील उचलली जातात.

आता वर विचारलेल्या प्रश्नांमध्ये ताईच्या लग्नाला फक्त तीन वर्षे झाली आहेत. तीन वर्षानंतर मुलाची जबाबदारी त्या उत्तम रीतीने पार पाडत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःची नोकरी देखील सोडली आहे. घरात कशाचीच काही कमतरता नाही असे देखील त्यांचे म्हणणे आहे. पण त्यांचे पती त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. ते अरसिक आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version