लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?

विवाह हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट असतो. लग्न ठरवताना आपण अनेक गोष्टींची चौकशी करतो. तुमचे घर, नोकरी आणि पगार कसा आहे? जर तुम्हाला अधिक शारीरिकदृष्ट्या आरामशीर वैवाहिक जीवन हवे असेल आणि तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी वाटत असेल. त्यात काही गैर नाही.

खरं तर, आपण असे गृहीत धरू शकतो की आपला भावी जोडीदार निरोगी आणि मजबूत आहे. परंतु तो खरंच तसा आहे कि नाही? ह्याचा ही विचार आपल्याला येऊ शकतो. या लेखात, आपण पाहू लग्न करण्यापूर्वी कोणत्या वैद्यकीय चाचण्या कराव्यात? या प्रश्नाचे उत्तर नक्कीच या लेखात मिळेल.

लग्न करण्यापूर्वी कोणत्या वैद्यकीय चाचण्या केल्या पाहिजेत?

यापैकी काही वैद्यकीय चाचण्या लग्नापूर्वी केल्या जाऊ शकतात. त्यामुळे जोडप्यांना खात्री होते की ते दोघेही निरोगी आहेत. जर तुम्हाला वैद्यकीय तपासण्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना या संदर्भात मार्गदर्शन करण्यास सांगू शकता.

वैद्यकीय चाचणी तपासणीचे महत्व

     लग्नाआधी या चाचण्या केल्याने जोडीदाराच्या तब्येतीच्या निम्म्या गोष्टी आधीच कळतात आणि जास्त धोके टळतात, त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या शारीरिक ताकदीची आपल्याला आधीच कल्पना असते. भविष्यात काळजी घेणे महत्त्वाचे आहे आणि या चाचण्या तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल बरेच काही सांगू शकतात. आपला जोडीदार किती सुदृढ आहे हे जाणून घेण्यास मदत होते.

जे लोक प्रेम विवाह करतात त्यांना त्यांच्या जोडीदाराबद्दल बरेच काही माहित असते. जे अरेंज मॅरेज करतात. त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल फारसे माहित नसते. त्यामुळे जे कोणी लग्न करू इच्छितात. त्यांनी या चाचण्या करून घ्याव्यात असे मला वाटते.

     कोणत्याही चाचण्या करण्यापूर्वी दोघांचीही संमती असणे महत्त्वाचे आहे. कारण जर एखादी व्यक्ती म्हणाली की त्यांना चाचणी नको आहे, तर त्यांच्यावर जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. कारण ते त्याचे वैयक्तिक मत असू शकते.

अशा वेळी जोडीदाराला समजून घेऊन, चाचण्यांचे महत्त्व समजावून सांगून आणि गैरसमज दूर करून त्यासाठी तयार करता येते. दोन्ही कुटुंबातील लोकांना चाचण्यांबद्दल सांगायचे की नाही? हे त्या जोडप्याने ठरवायचे आहे.कारण सगळ्यांनाच हे पटेल याची  शाश्वती नाही .

तात्पर्य :

         तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन शक्य तितके यशस्वी करायचे असल्यास, तुम्ही लग्न करण्यापूर्वी वैद्यकीय चाचण्या करून घेण्याचा विचार करावा.
Exit mobile version