आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?

         प्रत्येक पालकांची एकच इच्छा असते. आपल्या मुलांचं भलं व्हावं. त्यांना योग्य तो जोडीदार मिळावा. योग्य वयात त्यांचे लग्न व्हावे आणि पुढे त्यांचा संसार फुलावा. यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न सुरू असतात.अगदी स्थळ शोधण्यापासून ते लग्न लागेपर्यंत सगळी जबाबदारी पालक आपलं आद्य कर्तव्य म्हणून पार पाडतात.मुलांच्या सुखी संसाराला वाढताना पाहतात. पण बऱ्याच अंशी असे दिसून येते की लग्न झाल्यानंतर नुसती भांडण, क्लेश इत्यादींचा सामना त्यांना करावा लागतो. काही ठिकाणी हे नसेलही. पण मग मुलाचे लग्न झालेल्या आजकालच्या आई-वडिलांनी नेमकं कसं वागावं हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरतं. चला तर पाहूया या लेखामध्ये.

आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?

तर ह्या अशा काही पद्धतीने लग्न झाल्यानंतर मुलाच्या आई-वडिलांनी वागावे.

सत्य परिस्थिती:

             आताच्या काळात लग्न झाल्यानंतरही मुलाला व त्याच्या बायकोला आई वडील सांभाळत असतात किंवा पोसत असे म्हणा. पालकांना वाटते की लग्न लावून दिले म्हणजे तो जबाबदारी पाडेल. पण जोपर्यंत पालक ही जबाबदारी स्वतःहून मुलाच्या खांद्यावरती टाकत नाहीत तोपर्यंत तो जबाबदार कसा बनणार? आता तो काही लहान नाही. त्यात जरा काही अडचणी आल्या, जरा काही मुलाला त्रास झाला, तर पालक अगदी देवदुता सारखे मदतीस धावून जातात.

मुलांना देखील थोडेफार चटके सहन करू द्या, संसार कसा करायचा हे शिकू द्या, अनुभव घेऊ द्या. तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा. पण सतत पुढे पुढे करू नका. अशाने त्यांना आयती सवय लागेल आणि ते स्वतःची जबाबदारी विसरतील.

        शेवटी एवढेच सांगेन की लग्न झालेल्या मुलाला त्याची स्वतःची जबाबदारी ओळखू द्या, घेऊ द्या आणि पार पाडू द्या. तुम्ही मात्र त्याचे आधारस्तंभ म्हणून नेहमी त्याच्या पाठीशी उभे रहा.    

Exit mobile version