नवरी मिळे नवऱ्याला
  • बातम्या
  • धार्मिक
    • पौराणिक
    • सण
    • पौराणिक कथा
    • गणपती बाप्पा
    • पूजा अर्चा
    • उपाय
    • अमावस्या
    • पौर्णिमा
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
Saturday, June 14, 2025
  • Login
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
नवरी मिळे नवऱ्याला
No Result
View All Result
Home कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

लग्न पत्रिका पाहणे किती आवश्यक

in कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन, ज्योतिष शास्त्र, लगीनघाई, लग्न समस्या आणि त्यांचे उपाय, लग्नाविषयी बोलू काही, विवाहपूर्व सल्ला
0
6
SHARES
32
VIEWS

        लग्न म्हणजेच विवाह. ज्यामुळे दोन जीव एकत्र येतात. पण हे लग्न होण्याआधी त्यांना विविध गोष्टींच्या निकषातून जावे लागते. त्यातील एक म्हणजे लग्न पत्रिका म्हणजेच वधू व वराची जन्म कुंडली. या पत्रिके शिवाय पुढील बोलणे होतच नाही. कारण पत्रिका जुळणे हे देखील सगळ्यात महत्त्वाचे मानले गेले आहे. हल्ली या गोष्टीस फारसे महत्त्व दिले जात नाही. तरी देखील वडीलधारी मंडळी लग्नपत्रिका जुळवण्याचा आग्रह धरतात. चला पाहू लग्न पत्रिका पाहणे किती आवश्यक आहे?

लग्न पत्रिका (कुंडली जुळणे) पाहणे किती गरजेचे?

         सर्वात पहिले तर लग्नपत्रिका किंवा आपली जन्म कुंडली ही एक आपल्या जीवनाचा आराखडा आहे, नकाशा आहे. कारण ज्यावेळी एखादा बालक जन्म घेतो. त्यावेळी आकाशात ग्रह , तारे यांचा वेगवेगळा संगम होत असतो.

RelatedPosts

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल

लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

याचे वर्णन आपल्या जन्मकुंडलीत आपल्याला पहावयास मिळते. जन्म कुंडली मध्ये नऊ ग्रह आणि बारा राशी असतात. ज्या आपल्या जीवनाला प्रभावित करतात. तसेच प्रत्येक ग्रहाचा एक स्वामी असतो आणि त्या ग्रहाचे गुणधर्म त्या व्यक्तीमध्ये उतरतात असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे.

त्यामुळे एकाच दिवशी जन्मलेल्या लोकांचे नक्षत्र, ग्रहांची स्थिती हे सर्व काही वेगवेगळे असू शकते आणि म्हणूनच एका दिवशी जन्मलेल्या व्यक्तींपैकी एक राजा असतो किंवा भिकारी पण असू शकतो. एकंदरीतच ग्रहांची स्थिती ही प्रत्येकाच्या जन्माच्या वेळी एकसारखीच असेल असे नाही.

दोन वेगवेगळ्या व्यक्ती आणि वेगवेगळी ग्रह स्थिती अगदी जुळ्या मुलांमध्ये देखील पहावयास मिळते. कारण त्यांच्या जन्म वेळेमध्ये सेकंदाचा फरक नक्कीच असतो आणि त्यामुळे ग्रहस्थिती देखील त्या सेकंदाच्या फरकाने बदलत असते.

लग्न पत्रिकेचे महत्त्व:

  •           लग्न जुळवताना लग्न पत्रिका बघणे हे गरजेचे आहे. कारण इथे ३६ गुणांपैकी किती गुण जुळतात हे तपासून पाहिले जाते. म्हणजेच मुलाची आणि मुलीची पत्रिका नेमकी ३६ गुणांपैकी किती गुणांमध्ये जुळते हे पाहिले जाते.
  •        यात जर १९ पेक्षा जास्त गुण जुळले तर फारच चांगले असे म्हणतात. म्हणजे संसार सुखाचा होतो असेही म्हणतात. ३०,३२ किंवा ३६ गुण जुळणार असतील तर अतिउत्तम.
  •         पण बऱ्याचदा याचे उलटे देखील होऊ शकते. ज्यांचे कमी गुण जुळतात त्यांचे वैवाहिक जीवन खूप चांगले जाते आणि ज्यांचे जास्त गुण जुळतात त्यांचे वैवाहिक जीवन थोडे कष्टमय जाते. त्यामुळे पुन्हा एकदा पत्रिका नीट बघावी लागते. काही उपाय करावे लागतात.
  •       पत्रिकेमध्ये गोत्र पाहणे देखील महत्त्वाचे ठरते. दोघांची गोत्रे सारखे नाहीत ना? नाहीतर त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यत त्रास उद्भवू शकतो. तसेच पत्रिकेमध्ये मंगळदोष आहे का? किंवा इतर काही गोष्टींपासून बाधा आहे का? हे देखील पाहिले जाते.
  •       आपली पत्रिका ही आपल्या आयुष्याचा एक आरसा आहे. भूतकाळ, भविष्यकाळ यामधील सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या या पत्रिकेमध्ये नक्कीच सापडतात यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पत्रिका जुळते की नाही हे पाहिल्यामुळे पुढील त्रास कमी होतात. तसेच जर काही उपाय असतील तर ते सुचवले जातात. त्यामुळे दोघांचेही वैवाहिक आयुष्य सुखी होऊ शकते.

तात्पर्य:

       जसे की मी आधी म्हटले हल्ली लग्न पत्रिकेवरचा, जन्म कुंडली वर विश्वास सध्याच्या तरुण पिढीचा नाही आहे. त्यांना हे पत्रिका पाहणे वगैरे वेळ वाया घालवणे असेच वाटते. आता हा त्यांच्या विचारांचा भाग झाला. काहींना ह्यात बोगसपणा, अंधश्रद्धा देखील वाटू शकते. यावरती विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

      पण तरी देखील लग्न करण्याआधी आपली लग्न पत्रिका, जन्मपत्रिका एकदा जुळवून नक्की पहावी. म्हणजे पुढील येणारे अडथळे, त्रास याबाबतीत थोडीफार पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते. त्यावरती योग्य त्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात.

ज्योतिष शास्त्रात वेगवेगळे उपाय असून त्या उपायांमुळे आपण आपले त्रास कमी करू शकतो आणि आपले वैवाहिक जीवन सुखी व धन्य करू शकतो हे देखील तेवढेच खरे आहे.

Tags: कुंडली मिलनज्योतिष शास्त्रलग्न पत्रिका पाहणे किती आवश्यक

Related Posts

लग्नाआधी हळद का लावली जाते?
धार्मिक

लग्नाआधी हळद का लावली जाते?

February 3, 2024
सुखी संसाराची सूत्रे
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

सुखी संसाराची सूत्रे

January 29, 2024
मुलगा व मुलीचा रक्त गट एकच असेल तर काय होईल?
लगीनघाई

मुलगा व मुलीचा रक्त गट एकच असेल तर काय होईल?

February 3, 2024
लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

January 19, 2024
लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?

January 30, 2024
मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या लग्नाचे निर्णय घेऊ देणे योग्य कि अयोग्य?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या लग्नाचे निर्णय घेऊ देणे योग्य कि अयोग्य?

January 29, 2024
आधुनिक विवाह का अयशस्वी होतात?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

आधुनिक विवाह का अयशस्वी होतात?

January 21, 2024
लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात
परंपरा

लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात

January 19, 2024

Recommended

पौर्णिमा: माहिती जाणून घ्या सर्वकाही

पौर्णिमा: माहिती जाणून घ्या सर्वकाही

January 30, 2024
लग्नाआधी हळद का लावली जाते?

लग्नाआधी हळद का लावली जाते?

February 3, 2024

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Don't miss it

No Content Available

नमस्कार

मंडळी आपले स्वागत आहे. आजकाल लग्न जुळविणे एक कठीण समस्या होऊन बसली आहे. इथे आपणास लग्न जुळविण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Recent Comments

    • About
    • Privacy Policy
    • Contact Us
    • Terms
    • Disclaimer

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    No Result
    View All Result
    • Home
    • धार्मिक
    • लगीनघाई
      • लग्नाविषयी बोलू काही
      • घरजावयांचे प्रश्न
      • नात्यांविषयी बोलू काही
    • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
    • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
    • विवाहपूर्व सल्ला

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
    Go to mobile version