नवरी मिळे नवऱ्याला
  • बातम्या
  • धार्मिक
    • पौराणिक
    • सण
    • पौराणिक कथा
    • गणपती बाप्पा
    • पूजा अर्चा
    • उपाय
    • अमावस्या
    • पौर्णिमा
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
Sunday, June 15, 2025
  • Login
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
नवरी मिळे नवऱ्याला
No Result
View All Result
Home धार्मिक अमावस्या

अमावस्या: वाईट शक्ति? की इतर काही?

in अमावस्या, उपाय, धार्मिक, पूजा अर्चा
0
अमावस्या: वाईट शक्ति? की इतर काही?
6
SHARES
32
VIEWS

अमावस्या

       “अमावस्या” हा शब्द आपल्या सर्वांना माहीतच असेलच. आपल्याकडे अमावस्या म्हटली की एक भीतीचं वातावरण आपल्या मनात तयार होते. कारण घरातील वडीलधाऱ्या माणसांनी हेच सांगितलेलं असतं की अमावस्या म्हणजे वाईटच.

या दिवशी भूत खेतं जमिनी वरती येतात. तसेच एखादी वाईट शक्ती किंवा कोणाच्या नुकसान करायचे असेल तर त्यासाठी करणी करणे किंवा इतर पूजा वगैरे करण्याचा हा दिवस असतो. पण त्याही पलीकडे ही अमावस्या म्हणजे काय? ते आपण या लेखात पाहूया.

अमावस्या: वाईट शक्ति? की इतर काही?

     अमावस्या : एक तिथी

     अमावस्या ही एक चंद्र तिथी आहे. म्हणजेच या दिवशी चंद्र दिसत नाही. आपल्या ब्रम्हांडात चंद्र या ग्रहाच्या स्थितीमुळे आपल्या भूतलावरती वेगवेगळे परिवर्तन आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच ज्या तिथीला चंद्र आपल्याला अजिबात दिसत नाहीत. एकदम गडद काळोख किंवा गर्द अंधार असतो ती म्हणजे अमावस्या. अमावस्येला सूर्यग्रहण होते.

तसेच चंद्र हा दिवसा आकाशात तर असतो. पण तो सूर्याच्या अगदी जवळ असतो. त्यामुळे त्या सूर्यप्रकाशात आपल्याला दिसत नाही आणि म्हणून रात्री पृथ्वीवरून आपण चंद्र पाहू शकत नाही. कारण की तो दिसतच नाही. ही तिथी अमावस्या म्हणून अशी संबोधली जाते.

RelatedPosts

एकादशी: जाणून घ्या नेमका अर्थ, प्रमुख एकादशी, कथा, महत्व

धुलीवंदनाची : कारणे, काळजी, स्वरूप

रथसप्तमी: कथा, पूजाविधी, महत्व, उपाय

अमावस्येचे प्रकार किती: कधी व केव्हा येते?

      तसे पाहता प्रत्येक महिन्यात एकदाच अमावास्या येते. त्यात वेगवेगळ्या अमावस्या आपण ऐकल्याच असतील. सोमवारी येणारी सोमवती अमावस्या, शनिवारी येणारी शनी अमावस्या, आषाढ महिन्यातली आषाढी अमावस्या, जी ला आपण गटारी पण म्हणतो त्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. त्यानंतर  पिठोरी अमावस्या, सर्वपित्री अमावस्या, पौष महिन्यात येणारी मौनी अमावस्या. या वेगवेगळ्या महिन्यात येणाऱ्या अमावस्या आपण ऐकल्याच असतील.

    तर अशी ही अमावस्या जी प्रत्येक महिन्यात येतेच. कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजे अमावस्या.

या तिथीतही देवता आहे. ती म्हणजे पितरे. म्हणजेच आपले पूर्वज. या दिवशी आपण पितृ दान करू शकतो. तर्पण करू शकतो. श्राद्ध करू शकतो.

आपल्याकडे अमावास्येबद्दल अनेक समज गैरसमज आहेत आणि आपण ते पूर्वापार चालत आल्यामुळे तसेच पाळत असतो आणि अजूनही पाळत आहोत. जसे कि अमावास्येच्या दिवशी प्रवास करू नये किंवा रात्र झाल्यावर घराबाहेर पडू नये. नकारात्मक शक्ती बाहेर वावरत असतात. अमावास्येच्या दिवशी नारळ देण्याची देखील प्रथा आहे. बऱ्याचदा अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी अर्धवट फोडलेले नारळ चौकात आढळतात. ते याच प्रथेमुळे. अजून एक म्हणजे घरातील लहान मुलांची दृष्ट काढली जाते आणि त्या नंतर काही झाले तरी त्यांना घराबाहेर पाठवत नाही. तर हे असे अनेक समज जे अजूनही पाळले जातात.   

अमावस्या एक शापित रात्र?

      अमावस्याकडे आपण नेहमीच वाईट गोष्ट म्हणून बघत आलो आहोत. तो काळा दिवस ज्या दिवशी चंद्राचा प्रकाश नसतो. अशी ती शापित रात्र असते असे देखील म्हणतात. पितरांचा वावर असणारी, काळीभोर रात्र…… ज्यात नेहमी वाईटच घडते. जोदू टोणा करण्यासाठी योग्य अशी हि रात्र असते. असा समज आहे. त्यात कोणतेही शुभ कार्य आपण या दिवशी अजिबात करत नाही. एक तर अमावस्या झाल्यानंतर ते कार्य करतो. मग ते कुठचेही असो. पण या दिवसात जर झाडे लावली तर ती चांगली बहरतात असा समज आहे. त्यांची वाढ चांगली होते. इतकेच नव्हे तर केस देखील अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी कापले तर ते देखील वाढतात. कारण अमावास्येपासून चंद्र कले कलेने वाढत जातो आणि मग पौर्णिमा येते. त्यामुळे जशी चंद्राची वाढ होते. तशीच आपल्या केसांचीदेखील वाढ होते, झाडांची देखील वाढ होते. म्हणून  अमावस्येदिवशी झाडे लावावीत. 

      तर अशी हि अमावस्या…. आपल्याला नको असलेली. तरी आपल्या महिन्याचा एक अविभाज्य भाग. कारण अंधारानंतर प्रकाश येतोच. अगदी तसेच अमावस्येनंतर पौर्णिमा हि येतेच. त्यामुळे अमावस्या नक्कीच गरजेची आहे आणि हि एक तिथी आहे. काही संपूर्ण महिना किंवा वर्ष अमावस्या नाही आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. फक्त प्रत्येक महिन्यातून एकदा हि अमावस्या येते आणि ती येणारच.
आपल्या कालमापनातील एक नेहमी होणारी गोष्ट आहे. त्यामुळे कॅलेंडर मध्ये नक्कीच हा अमावस्येचा दिवस नेहमी असणार यात तीळ मात्र शंका नाही. अमावस्येच्या दिवशी अनेक तोडगे केले जातात. ज्याने आपले आयुष्य सोपे होते आणि जीवनातील काही अडचणींवर मात करता येते. या तोडग्यांनी खरंच काही होते हे काही माहित नाही. पण अनेक जण अमावस्येदिवशी काही तोडगे करतात. तर हि होती अमावस्या या दिवसाची माहिती.

Tags: अमावस्यातिथिप्रथा

Related Posts

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रतकथा
उपाय

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रतकथा

February 3, 2024
दीप अमावास्या: जाणून घ्या महत्व, पूजा विधी, माहिती, उपाय
धार्मिक

दीप अमावास्या: जाणून घ्या महत्व, पूजा विधी, माहिती, उपाय

February 24, 2024
नाडी दोष: प्रकार, समस्या व उपाय
उपाय

नाडी दोष: प्रकार, समस्या व उपाय

January 30, 2024
होळी: महत्व, पौराणीक कथा, काय करावे काय नको
उपाय

होळी: महत्व, पौराणीक कथा, काय करावे काय नको

February 24, 2024
आदर्श पत्नीचे गुण: जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

आदर्श पत्नीचे गुण: जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले

January 30, 2024
उपाय

धुलीवंदनाची : कारणे, काळजी, स्वरूप

March 1, 2024
एकादशी: जाणून घ्या नेमका अर्थ, प्रमुख एकादशी, कथा, महत्व
एकादशी

एकादशी: जाणून घ्या नेमका अर्थ, प्रमुख एकादशी, कथा, महत्व

March 2, 2024
धुळवड धुलीवंदन रंगपंचमी: कारणे, प्रथा, इतिहास, काय काळजी घ्याल
धार्मिक

धुळवड धुलीवंदन रंगपंचमी: कारणे, प्रथा, इतिहास, काय काळजी घ्याल

January 30, 2024

Recommended

वृषभ राशीच्या महिलांचा/ स्त्रियांचा/ मुलींचा स्वभाव

वृषभ राशीच्या महिलांचा/ स्त्रियांचा/ मुलींचा स्वभाव

February 3, 2024
लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?

लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?

January 30, 2024

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Don't miss it

No Content Available

नमस्कार

मंडळी आपले स्वागत आहे. आजकाल लग्न जुळविणे एक कठीण समस्या होऊन बसली आहे. इथे आपणास लग्न जुळविण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Recent Comments

    • About
    • Privacy Policy
    • Contact Us
    • Terms
    • Disclaimer

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    No Result
    View All Result
    • Home
    • धार्मिक
    • लगीनघाई
      • लग्नाविषयी बोलू काही
      • घरजावयांचे प्रश्न
      • नात्यांविषयी बोलू काही
    • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
    • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
    • विवाहपूर्व सल्ला

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
    Go to mobile version