नवरी मिळे नवऱ्याला
  • बातम्या
  • धार्मिक
    • पौराणिक
    • सण
    • पौराणिक कथा
    • गणपती बाप्पा
    • पूजा अर्चा
    • उपाय
    • अमावस्या
    • पौर्णिमा
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
Sunday, June 15, 2025
  • Login
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
नवरी मिळे नवऱ्याला
No Result
View All Result
Home कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

पुरुष कोणत्या गोष्टी आपल्या पत्नीपासून लपवतात?

in कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन, नात्यांविषयी बोलू काही, लग्न समस्या आणि त्यांचे उपाय, लग्नाविषयी बोलू काही
0
पुरुष कोणत्या गोष्टी आपल्या पत्नीपासून लपवतात?
6
SHARES
32
VIEWS

     संसार हा दोन जीवांचा असतो. असं म्हणतात की नवरा आणि बायको सात जन्माचे साथीदार असतात. तसेच बऱ्याचदा आपण असे ऐकतो देखील की माझा नवरा मला सर्व काही सांगतो, अशी एखादी पत्नी ठामपणे आपल्या मैत्रिणींना सांगते. पण खरंच असं असतं का? या लेखामध्ये पाहूया नवरा कोणत्या गोष्टी आपल्या बायको पासून लपवतो ?

पुरुष कोणत्या गोष्टी आपल्या पत्नीपासून लपवतात?

  • काही पुरुषांना स्वतःच्या खाजगी आणि खूप जवळच्या अशा गोष्टी कोणालाच सांगायला आवडत नाही. मग ते त्या गोष्टी एखाद्या डायरीत लिहून ठेवतील. पण कोणाला सांगणार नाही. अगदी त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्र-मैत्रिणींना देखील नाही. काहीजण याबाबतीत अपवाद असू शकतील.
  • काही पुरुष स्वतःचे आर्थिक व्यवहार देखील आपल्या पत्नीला सांगत नाही.
  • पुरुष बऱ्याचदा आर्थिक व्यवहार करताना देखील पत्नीचे मत गृहीत धरत नाहीत आणि स्वतःचा निर्णय घेऊन मोकळे होतात.
  • ऑफिसमध्ये घडणाऱ्या घडामोडी देखील काही पुरुषांना स्वतःच्या पत्नीला सांगाव्याशा वाटत नाही. जर पत्नीने विचारले की आजचा दिवस कसा होता. तर चांगला होता, वाईट होता एवढेच सांगून विषय संपवतील. जर ऑफिसमध्ये एखादी गोष्ट घडली असेल तर तिची चर्चा देखील ते घरात करत नाहीत.
  • एखाद्या पुरुषाचे बाहेर परस्त्री बरोबर एखाद्या लफडे वगैरे असेल तर ते देखील ते लपवूनच केले जाते.
  • पुरुषांच्या जर अनेक मैत्रिणी असतील तर त्या देखील पत्नीला माहितीच नसतात.
  • काही पुरुष मंडळी ऑफिसमधल्या लोकांबरोबर पिकनिकला किंवा बाहेरगावी फिरायला जायचे ठरवतात. पण याची पूर्वकल्पना स्वतःच्या पत्नीला देत नाहीत. ऑफिसचे काम आहे असे सांगून स्वतःची पिकनिक करून घेतात.
  • काही पुरुषांना त्यांच्या बायकोने स्वतःच्या, त्यांच्या कोणत्याच वस्तूला हात लावलेला देखील आवडत नाही. स्वतःसाठी एखादी वस्तू खरेदी करून घेऊन येतील आणि ती लपवून ठेवतील. बायकोच्या नकळत मग ती वापरतील.
  • पुरुषांना अनेकदा बायकोने त्यांचे मोबाईल वापरू नये असे देखील वाटते. त्यासाठी फोनला लॉक करून ठेवतील.
  • जर काही पुरुषांना एखाद्या व्यसन असेल आणि ते बायकोला माहीत नसेल. तर अशी व्यसन लपून-छपूनच केले जाते. याची देखील कल्पना त्यांच्या पत्नीला अजिबात नसते.
  • जर एखादा पुरुष खवय्या असेल तर बाहेरच काहीतरी खाऊन येईल पण घरी बायकोला सांगणार नाही.

तर ह्या होत्या काही गोष्टी. ज्यातूनही नक्कीच कळते की पुरुष आपल्या पत्नीपासून हे सगळे लपवूनच ठेवतो. काही पुरुष याला अपवाद असतील. सगळेच असे असतात असे मी अजिबात म्हणत नाही. कारण काहींना स्वतःच्या बायकोचा निर्णय किंवा तिचे मत विचारात घेणे देखील खूप आवडते.

RelatedPosts

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल

लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

अगदी लहान लहान गोष्टींमध्ये देखील बायकोचे मत विचारात घेतले जाते. असे देखील पुरुष आपल्या समाजात अजून आहेत की जे स्वतःच्या बायकोला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात, तिचा मान ठेवतात, तिचा आदर करतात, तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

तात्पर्य:

     काही गोष्टींमध्ये गुप्तता ही राखावी. पण ते नंतर उघडपणे सांगावे देखील. त्यावेळी किती गरज होती म्हणून तुम्ही ती गुप्तता पाळली आणि आता तुम्ही ती सांगत आहात हे देखील तिला सांगावे. कारण असे लपून-छपून जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नकळत काही करत असाल.

तर ते तिला कधी ना कधीतरी कळेलच आणि ते कळल्यानंतर ती दुखावली जाईल. जर तसे होऊ नये असे वाटत असेल तर आधीच पूर्णपणे पारदर्शकता ठेवल्यास तुमचे नाते अजून समृद्ध होत जाईल यात तीळ मात्र देखील शंका नाही. जसे तुमच्या पत्नीचा वाढदिवस आहे आणि तुम्ही तिच्यासाठी एखादी भेट वस्तू आणली. ती लपवून ठेवली किंवा तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही काही वेगळा कार्यक्रम करण्याचे नियोजित केले आहे.

या गोष्टींची जाणीव तिला नाही करून दिली तर ते समजू शकतो. पण एखादा वाईट मार्ग तुम्ही अवलंबलेला आहे किंवा एखादे लफडे जर तुमचे आहे आणि ते तुमच्या पत्नीला माहित नाही. तर मग याचे गंभीर परिणाम नंतर भोगावे लागतात. याची देखील तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे. त्यामुळे शक्यतो पत्नीपासून काही लपवू नये.

Tags: majh ghar majha sansarnavra baykoche nateनवरा बायको

Related Posts

लग्नाला होकार देण्याआधी या गोष्टी नक्की तपासून पहा
लगीनघाई

लग्नाला होकार देण्याआधी या गोष्टी नक्की तपासून पहा

February 1, 2024
मुलगा व मुलीचा रक्त गट एकच असेल तर काय होईल?
लगीनघाई

मुलगा व मुलीचा रक्त गट एकच असेल तर काय होईल?

February 3, 2024
गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

January 18, 2024
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

लग्न पत्रिका पाहणे किती आवश्यक

January 5, 2024
बायकोने नवऱ्याला कधीच सांगू नयेत या ५ गोष्टी
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

बायकोने नवऱ्याला कधीच सांगू नयेत या ५ गोष्टी

January 30, 2024
लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

लग्न करण्या अगोदर कोणत्या चाचण्या / तपासण्या कराव्या?

January 30, 2024
लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात
परंपरा

लग्नासाठी मुलीमध्ये कोणते गुण पहिले जातात

January 19, 2024
नोंदणी विवाह: कसा करतात / किती खर्च येतो
लगीनघाई

नोंदणी विवाह: कसा करतात / किती खर्च येतो

January 30, 2024

Recommended

आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?

आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?

January 30, 2024
गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

January 18, 2024

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Don't miss it

No Content Available

नमस्कार

मंडळी आपले स्वागत आहे. आजकाल लग्न जुळविणे एक कठीण समस्या होऊन बसली आहे. इथे आपणास लग्न जुळविण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Recent Comments

    • About
    • Privacy Policy
    • Contact Us
    • Terms
    • Disclaimer

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    No Result
    View All Result
    • Home
    • धार्मिक
    • लगीनघाई
      • लग्नाविषयी बोलू काही
      • घरजावयांचे प्रश्न
      • नात्यांविषयी बोलू काही
    • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
    • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
    • विवाहपूर्व सल्ला

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
    Go to mobile version