नवरी मिळे नवऱ्याला
  • बातम्या
  • धार्मिक
    • पौराणिक
    • सण
    • पौराणिक कथा
    • गणपती बाप्पा
    • पूजा अर्चा
    • उपाय
    • अमावस्या
    • पौर्णिमा
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
Monday, March 23, 2026
  • Login
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
नवरी मिळे नवऱ्याला
No Result
View All Result
Home लगीनघाई

नोंदणी विवाह: कसा करतात / किती खर्च येतो

in लगीनघाई, लग्न समस्या आणि त्यांचे उपाय, लग्नाविषयी बोलू काही, विधि, विवाहपूर्व सल्ला, विवाहसोहळा
0
नोंदणी विवाह: कसा करतात / किती खर्च येतो
6
SHARES
32
VIEWS

प्रश्न: मला नोंदणी विवाह करायचा आहे त्यासाठी काय करावें लागेल आणि किती खर्च येईल?

आपल्याकडे विवाह संस्कृतीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे विवाह सोहळे हे दिमाख्यात व्हावे असा बऱ्याच जणांचा आग्रह असतो. पण हल्ली हे चित्र तसे बदलताना दिसत आहे. बऱ्याच अंशी काही तरुणांचा न्यायालयीन विवाह म्हणजे रजिस्टर पद्धतीने विवाह करण्याकडे कल आहे. तरी पारंपारिक पद्धतीने लग्न करणाऱ्यांची संख्या देखील भरपूर प्रमाणात आहे. या लेखात पाहू नोंदणी विवाह (नोंदणीकृत विवाह/ रजिस्टर मॅरेज/न्यायालयीन विवाह) कसा केला जातो?

RelatedPosts

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल

लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

नोंदणी विवाह: कसा करतात / किती खर्च येतो

विचारलेल्या प्रश्नात एक सुधार करू इच्छिते कि नोंदणी विवाह म्हणण्यापेक्षा रजिस्टर विवाह म्हणणे योग्य ठरेल कारण पारंपरिक पद्धतीने विवाह झाल्यावर देखील विवाहाची नोंदणी होते. त्यामुळे या दोन शब्दांमध्ये गफलत होते. नेमके नोंदणी विवाह म्हणजेच विवाहाची नोंदणी म्हण्याचे आहे कि रजिस्टर विवाह? म्हणून रजिस्टर विवाह असे म्हटलेले चांगले.

रजिस्टर विवाह करण्याची नेमकी प्रक्रिया:

●        रजिस्टर विवाह करण्याची पद्धत स्पेशल मॅरेज अॅक्ट मध्ये दिली आहे.

●        यात मुलाचे वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे असावे.

●        मुलाचे किंवा मुलीचे पाहिले लग्न झाले नसावे आणि झाले असेल तर घटस्फोट झाला असावा

           किंवा त्यांचे नवरा आणि बायको जिवंत नसावेत.

●        तसेच लग्न करून इच्छिणाऱ्या मुलगा आणि मुलीचे रक्ताचे नाते नसावे.

●        मुलगा आणि मुलगी मानसिक दृष्ट्या सक्षम असावेत.

●        रजिस्टर विवाह करण्यासाठी तुम्हाला विवाह नोंदणी कार्यालय ( ग्रामपंचायत, तालुका, किंवा

           जिल्हा स्तरावरील) मध्ये जाऊन लग्नासाठी अर्ज द्यावा लागतो.

●        अर्जासोबत दोन पासपोर्ट फोटो दोघांचे, जन्म दाखला, अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड

           इत्यादी.

●        मुलगा किंवा मुलगी यांच्या पैकी एकाने ते जिथे राहतात त्या ठिकाणच्या विवाह कार्यालयात लग्न

           करण्यापूर्वी किमान तीस दिवस आधी जाणे गरजेचे आहे.

●        लग्नासाठी विहित अर्ज तिथे मिळतो. त्यासोबत कोर्ट फी स्टॅम्प व योग्य ती प्रमाणपत्रे लाऊन तो

          अर्ज मॅरेज ऑफिसर कडे सबमिट करायचा. तो तुम्हाला तीस दिवसानंतर ची तारीख आणि वेळ

           देईल. त्याच तारखेला आणि वेळेला हजर राहायचे.

●        तसेच या तीस दिवसांमध्ये तुमच्या लग्नाची नोटीस मॅरेज ऑफिस मध्ये लावण्यात येते. ही नोटीस

           घरी येत नाही. जर तुमच्या लग्नाविषयी कोणाला ऑब्जेक्शन तर ते घेऊ शकतात.

●        तीस दिवस पूर्ण झाल्यावर दिलेल्या दिवशी आणि वेळेत वधू आणि वर सोबत तीन साक्षीदार

           यांना घेऊन हजर राहणे गरजेचे असते.

●        तीन साक्षीदार आणि साक्षीदारांची ओळख पत्रे जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड, सोबत

          असावीत. हे साक्षीदार कोणी पण असून शकतात. जसे की आई वडील, इतर नातेवाईक किंवा   

          तुमचे मित्र मैत्रिणी.

●        मॅरेज ऑफिसर समोर तुमच्या आणि साक्षीदारांच्या सह्या होतात.

●        विवाह शपथ वाचावी लागते.

●        विवाह अधिकाऱ्याने विवाह रजिस्टर मध्ये नोंद केल्यावर तुम्हाला विवाह प्रमाणपत्र लगेच

           मिळते.

●        कमी खर्चात हा विवाह होऊ शकतो. जसे की फक्त अर्जाचे, कोर्ट फी स्टॅम्प आणि विवाह

           प्रमाणपत्र चे पैसे भरायचे असतात.

●         विवाह प्रमाणपत्र लगेच मिळते. पारंपरिक लग्नात ते नंतर काढावे लागते.

●     ज्यांचे प्रेम विवाह, अंतर जातीय विवाह किंवा विदेशी व्यक्तीनं बरोबर विवाह करायचे असतील

       त्यांना फार सोईचे ठरते.

●     साक्षीदार, अर्ज ,कागदपत्रं इत्यादींची जमवाजमव करणे. थोडीशी वेळ खाऊ पद्धत आहे.

●     फी प्रत्येक जिल्हा नुसार वेगवेगळी पण असू शकते.

तर अशा पद्धतीने रजिस्टर विवाह ( कोर्ट मॅरेज) होते.

तात्पर्य:

तर हि होती पद्धत नोंदणीकृत विवाह म्हणजेच रजिस्टर विवाहाची त्यानुसार तुम्ही हा विवाह करू शकता. खर्चाच्या बाबतीत विचारलं तर ते कार्यालयात जाऊन चौकशी करावी. कारण प्रत्येक राज्यानुसार फी वेगळी असते. तरी कमी खर्चात काम होते एवढे नक्की. एक फायदा म्हणजे यामुळे आपला विवाह आधीच नोंदवला जातो आणि मग आपण पारंपरिक विवाह करू शकतो.

Tags: mahiti marathi madheकोर्ट मॅरेजनोंदणी विवाहरजिस्टर विवाह

Related Posts

पुरुष कोणत्या गोष्टी आपल्या पत्नीपासून लपवतात?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

पुरुष कोणत्या गोष्टी आपल्या पत्नीपासून लपवतात?

January 30, 2024
आधुनिक विवाह का अयशस्वी होतात?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

आधुनिक विवाह का अयशस्वी होतात?

January 21, 2024
साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असावे?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असावे?

January 21, 2024
मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?
उपाय

मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?

January 29, 2024
आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?

January 30, 2024
मुलगा व मुलीचा रक्त गट एकच असेल तर काय होईल?
लगीनघाई

मुलगा व मुलीचा रक्त गट एकच असेल तर काय होईल?

February 3, 2024
आदर्श पत्नीचे गुण: जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

आदर्श पत्नीचे गुण: जे द्रौपदीने सत्यभामाला सांगितले

January 30, 2024
दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल

January 18, 2024

Recommended

दीप अमावास्या: जाणून घ्या महत्व, पूजा विधी, माहिती, उपाय

दीप अमावास्या: जाणून घ्या महत्व, पूजा विधी, माहिती, उपाय

February 24, 2024
दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल

दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल

January 18, 2024

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Don't miss it

No Content Available

नमस्कार

मंडळी आपले स्वागत आहे. आजकाल लग्न जुळविणे एक कठीण समस्या होऊन बसली आहे. इथे आपणास लग्न जुळविण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Recent Comments

    • About
    • Privacy Policy
    • Contact Us
    • Terms
    • Disclaimer

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    No Result
    View All Result
    • Home
    • धार्मिक
    • लगीनघाई
      • लग्नाविषयी बोलू काही
      • घरजावयांचे प्रश्न
      • नात्यांविषयी बोलू काही
    • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
    • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
    • विवाहपूर्व सल्ला

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
    Go to mobile version