नवरी मिळे नवऱ्याला
  • बातम्या
  • धार्मिक
    • पौराणिक
    • सण
    • पौराणिक कथा
    • गणपती बाप्पा
    • पूजा अर्चा
    • उपाय
    • अमावस्या
    • पौर्णिमा
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
Saturday, June 14, 2025
  • Login
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
  • Home
  • धार्मिक
  • लगीनघाई
    • लग्नाविषयी बोलू काही
    • घरजावयांचे प्रश्न
    • नात्यांविषयी बोलू काही
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • विवाहपूर्व सल्ला
No Result
View All Result
नवरी मिळे नवऱ्याला
No Result
View All Result
Home कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

बायकोने नवऱ्याला कधीच सांगू नयेत या ५ गोष्टी

in कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन, नात्यांविषयी बोलू काही, लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
0
बायकोने नवऱ्याला कधीच सांगू नयेत या ५ गोष्टी
6
SHARES
32
VIEWS

बायको आणि नवऱ्याचे नाते हे जन्मोजन्मीचे असते असे म्हणतात. दोघे अगदी एकमेकांसाठीच बनले आहेत असे वाटते. “मेड फॉर इच अदर”, “दोघांची केमिस्ट्री फार चांगली आहे” असे बोलणे आपल्या कानावर पडते.

पण तरी देखील दोघं एकमेकांपासून काही ना काही नक्कीच लपवतात. ते कदाचित जाणून बुजून असेल किंवा अनवधानाने असू शकते. दोघांच्याही आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या त्यांनी एकमेकांना अजिबात सांगू नये किंवा बऱ्याचवेळा त्या नाही सांगितल्या जात. जसे की बायकोने खास करून आपल्या नवऱ्याला या पाच गोष्टी अजिबात सांगू नयेत.

RelatedPosts

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

दुसरे लग्न | पुनर्विवाह करताना काय काळजी घ्याल

लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

बायकोने नवऱ्याला कधीच सांगू नयेत या ५ गोष्टी

  • तिचा भूतकाळ : एखाद्या स्त्रीचा जर भूतकाळ असेल तर तो तिने स्वतःच्या नवऱ्याला अजिबात सांगू नये. कारण जर तो भूतकाळ नवऱ्याला तिने सांगितला तर नवऱ्याचा तिच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो. त्याचा संशय वृत्ती वाढीस लागू शकते जे की तिच्यासाठी किंवा त्यांच्या नात्यासाठीच घातक ठरू शकते.
  • मित्र-मैत्रिणी : काही स्त्रियांना अनेक मित्र मैत्रिणी असतात जे की लग्नानंतर देखील त्यांच्या संपर्कात असतात. त्यात काहींचे फार जवळचे असे घनिष्ठ असे मित्र देखील असतात. जर वारंवार बायकोने त्या मित्रांची चर्चा नवऱ्याच्या पुढ्यात केली तर नवऱ्यामध्ये असुरक्षित भावना उत्पन्न होऊ शकते आणि त्यांच्या नात्यांमध्ये देखील त्रास उद्भवू शकतात. तसेच काहीसे मैत्रिणीं बाबतीत देखील. काही काही मैत्रिणी तुमच्या नवऱ्याला न पटना सारख्या असतात. अशावेळी त्या मैत्रिणींशी संबंध तुम्ही गुप्तपणे ठेवला तर फार चांगला. जास्त त्यात न मिसळता तिच्याशी मैत्री ठेवावी म्हणजे तुमचा नवरा देखील दुखावला जाणार नाही आणि तुमची मैत्रीण देखील तुटणार नाही.
  • तुमची सेविंग : लग्नानंतर नवरा बायको मध्ये पारदर्शकपणा असायलाच हवा. खर्चाच्या बाबतीत म्हणा किंवा तुमच्या पगाराच्या बाबतीत म्हणा. नक्कीच ते गरजेचे आहे. पण स्वतःच्या हाती काहीतरी राखून मगच बाकी गोष्टी उघड केलेल्या चांगल्या. तुमच्याकडे जर काही जमा झालेली रोख रक्कम असेल ते तुम्ही न सांगितलेली बरी. कारण जर तुमचा नवरा उधळपट्टी करणारा असेल तर मग अडचणीच्या वेळी तुम्ही ही जमा केलेली रोख रक्कमच वापरली जाऊ शकते.
  • माहेरच्या गोष्टी : काही नवऱ्यांना तुमच्या माहेरच्या लोकांमध्ये अजिबात रस नसतो. तुम्ही त्यांचा उदो उदो केलेला देखील त्यांना पटत नाही. तसेच तुमच्या माहेरच्यांनी तुम्हाला एखादी मदत केली किंवा एखादी वस्तू अथवा पैसे दिले तर ते देखील काही नवऱ्यांना खपत नाही.   काही जण लाटायला बसले असतात ते वेगळे. अशावेळी आपल्या माहेरच्या माणसांची जुजबी माहिती आपल्या नवऱ्याला  द्यावी. त्याला जास्त खोलात शिरू देऊ नये.
  • सासरची माणसे : सासरच्या माणसांची नीट पद्धतीने वागणे. तसेच त्यांना न दुखावणे, त्यांची उणी दुणी न काढणे, तसेच नवऱ्याची उणी दुणी न काढणे. या सर्व गोष्टी पासून लांब राहावे. कारण जर या गोष्टी, त्याच्या म्हणजेच तुमच्या नवऱ्याच्या कानावरती पडल्या तर त्यांचा आत्मसन्मान दुखावला जाऊ शकतो आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते.

तरी या होत्या काही प्रमुख अशा पाच गोष्टी ज्या बायकोने नवऱ्याला सांगू नयेत. त्यातच तिचे भले आहे. याव्यतिरिक्त अजूनही बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत की ज्या नवऱ्या पर्यंत न पोहोचवलेल्या बऱ्या. कारण असे केल्याने पुढील वादविवाद टळतात , संभाव्य धोके टळतात  आणि नाते अबाधित राहते.

बायकोने नवऱ्याला कधीच सांगू नयेत वर दिलेल्या पाच गोष्टी असे करणे चांगले किंवा वाईट?

       तसे पाहता हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे की नवरा बायकोच्या नात्यामध्ये नेमके काय लपवायचे आणि काय सांगायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. कारण हल्ली छोट्या मोठ्या गोष्टींवरून देखील वाद होतात.

एखादी गोष्ट जर नवऱ्याला बाहेरून कळली किंवा बायकोने सांगितली नाही तर नवऱ्याचा नुसता तळतळाट होतो आणि सगळा राग तिच्यावरती निघतो. तेच जर उलट झाले. नवऱ्याने बायकोला एखादी गोष्ट सांगितली नाही. तर काही बायका चिडचिड करतात. काही बायका लक्षही देत नाहीत.

त्यामुळे इथे आपण पूर्णपणे सांगू शकत नाही की तुम्ही सगळेच काही नवऱ्याला सांगा. पूर्णपणे पारदर्शी रहा. पण तेवढे समजदार आपण नक्कीच आहोत की कोणती गोष्ट आपण आपल्या नवऱ्याला सांगायला हवी आणि कोणतीही गोष्ट सांगण्याची गरज नाही. याबाबतीतला निर्णय आपण नक्कीच घेऊ शकतो.

Tags: navra baykoche naterelationship husband wifeनवरा बायको

Related Posts

आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

आजकालच्या आई-वडिलांनी मुलाचं लग्न झाल्यावर कसं वागायला हवं?

January 30, 2024
गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

गरीब मुलाने अनाथ मुलीशी लग्न करावे का?

January 18, 2024
साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असावे?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

साखरपुडा ते लग्न किती महिन्याचे अंतर असावे?

January 21, 2024
मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?
उपाय

मंगळ असलेल्या मुलींशी लग्न करणे का टाळले जाते?

January 29, 2024
पुरुष कोणत्या गोष्टी आपल्या पत्नीपासून लपवतात?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

पुरुष कोणत्या गोष्टी आपल्या पत्नीपासून लपवतात?

January 30, 2024
विवाह होण्यासाठी, ठरण्यासाठी काही साधे उपाय
उपाय

विवाह होण्यासाठी, ठरण्यासाठी काही साधे उपाय

February 3, 2024
मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या लग्नाचे निर्णय घेऊ देणे योग्य कि अयोग्य?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या लग्नाचे निर्णय घेऊ देणे योग्य कि अयोग्य?

January 29, 2024
मुलीला स्वयंपाक येत नसेल तर लग्नानंतर मुलीने काय करावे ?
कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन

मुलीला स्वयंपाक येत नसेल तर लग्नानंतर मुलीने काय करावे ?

January 21, 2024

Recommended

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रतकथा

अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रतकथा

February 3, 2024
लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

लग्न जुळवताना मुलाची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते? कोणती काळजी घ्याल

January 19, 2024

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Don't miss it

No Content Available

नमस्कार

मंडळी आपले स्वागत आहे. आजकाल लग्न जुळविणे एक कठीण समस्या होऊन बसली आहे. इथे आपणास लग्न जुळविण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Categories

  • अमावस्या
  • उपाय
  • एकादशी
  • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
  • गणपती बाप्पा
  • गोष्ट लग्नानंतरची
  • ज्योतिष शास्त्र
  • धार्मिक
  • नात्यांविषयी बोलू काही
  • परंपरा
  • पूजा अर्चा
  • पौराणिक
  • पौराणिक कथा
  • पौर्णिमा
  • लगीनघाई
  • लग्न
  • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
  • लग्नाविषयी बोलू काही
  • विधि
  • विवाहपूर्व सल्ला
  • विवाहसोहळा
  • सण

Recent Comments

    • About
    • Privacy Policy
    • Contact Us
    • Terms
    • Disclaimer

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    No Result
    View All Result
    • Home
    • धार्मिक
    • लगीनघाई
      • लग्नाविषयी बोलू काही
      • घरजावयांचे प्रश्न
      • नात्यांविषयी बोलू काही
    • कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन
    • लग्न समस्या आणि त्यांचे उपाय
    • विवाहपूर्व सल्ला

    © 2024 Copyright - Navri Mile Navryala

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
    Go to mobile version